बदलाची चाहूल

Chernobyl अणुभट्टी नुकसानीनन्तर शास्त्रज्ञांनी साधारण ३० वर्षांनी त्या ठिकाणी झाड उगवेल असं सांगितलं होतं. Corona महामारीच्यावेळी माणसाचा पारिस्थितिकीशी संपर्क न आल्याने निसर्गाने स्वतःच्या जखमा स्वतःच भरायला सुरुवात केली होती.
निसर्ग आणि नियती वेळ आली की, अशी कूस बदलतात. हा देश पण बदलणार. इथले नागरिक त्यांच्या सद्य विचारांची कात टाकणार. हे 25 जूनच्या आसपास नोट्स मध्ये लिहून ठेवलं होतं. 25 जुलै रोजी देशाच्या शिक्षणमंत्र्यानी राजीनामा दिलाय. यार ये hopes बडी dangerous चीज होती है.
निषेध आणि तरुणाई म्हटलं की थोडावेळ का होईना रंग दे बसंती आठवतो. तसंच भारलेलं वातावरण होतं. रुबारु रोशनी गाणं पाहत, ऐकत असं सगळं उलथवून टाकण्याची स्वप्न पाहत मोठी झालेली आणि आता स्वतः च्या जबाबदार्‍यांमध्ये अडकलेली आमची पिढी. Generation x च्या धाकात आपल्या इच्छा आणि कर्तव्य दोघं पूर्ण करू पाहणारी. Gen z येडपट आहेत म्हणत, Generation अल्फाला जन्म देऊन, आता ह्यांच्या धाकात मोठं व्हावं लागेल असं एकमेकाला सांगणारी… आमच्यातल्या काहींनी gen z ना जन्म दिला. आम्ही millennials स्वतःला इतके शोधतोय की आपापल्या पोरांना आंदोलनात जातांना डोळे नाही दाखवत. हे आमच्यातले काही स्वतःला त्यांच्यात शोधत असतील का.. असो, आमच्यानंतरच्या पिढ्यांना abundance खूप मिळाला. तो प्रत्येक पिढीला, आधीच्या पिढीपेक्षा मिळतोच. पण अस्तित्व आणि जगण्याची भ्रांत कमी झालीय. ट्रेंड फॉलो करणं वाढलंय. शिव्या फक्त घराबाहेर देतात ही समज जुनी झालीय. दुनिया गेली तेल लावत. हे नुसतं म्हणायला नाही, त्याची अंमलबजावणी पण होऊ लागलीय.
आम्ही बसलोय, स्वप्नात आवडत्या ठिकाणच्या, आवडत्या घराला बघत. मग ते पूर्ण झाल्यावर सगळं मिळाल्यासारखं का वाटत नाहिये ह्याचा विचार करत. म्हणून कदाचित साहिरने आधीच सांगून ठेवलं होतं,
“किसका रस्ता देखे, ऐ दिल, ऐ सौदाई
मीलों है ख़ामोशी, बरसों है तनहाई
भूली दुनिया कभी की, तुझे भी, मुझे भी
फिर क्यों आँख भर आई..”
ही समज येतेच. सगळं कसं फोल वाटायला लागतं. पण मन मात्र शोधूनच काढतं पुढचं ध्येय, तेवढीच तन्हाई गेली तर गेली असं वाटत असेल बापड्याला…
~ तेजल एस.

whatsapp image 2026 07 29 at 12.53.42 pm

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *